---Advertisement---

IPL 2025 : आज पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, कोण देणार विजयी सलामी?

---Advertisement---

अहमदाबाद : १८व्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट हंगामात मंगळवारी नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेवले असून तो आयपीएलमध्ये नेहमीच वाईट कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्जचे नशीब पलटवण्याचा प्रयत्न करणार आहे.

२०२० च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केल्यानंतर चार वर्षांनी श्रेयस अय्यरने गच वर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्याचे मोठे यश मिळवले होते व आता त्याच्यासमोर पंजाब किंग्जची १८ वर्षांची पहिली आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याचे आव्हान आहे.

पंजाब संघ २०१८ मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला व २०१४ मध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचला, परंतु संघात अनेक बदल आणि नेतृत्व बदल असूनही, किंग्ज इलेव्हन पंजाबमधून पंजाब किंग्जमध्ये बदल करूनही, गत चार आवृत्त्यांमध्ये त्यांना अव्वल ५ मध्ये स्थान मिळवता आले नाही. तथापि, अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबकडे सिद्ध नेतृत्व क्षमता असलेला कर्णधार आहे. तो पंजाबमध्ये प्रशिक्षक रिकी पॉण्टिंगसोबत पुन्हा एकत्र येणार आहे व त्यामुळे नवीन सुरुवात करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ मिळेल.

दुसरीकडे, भारताचा वन-डे संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून कठीण हंगामाचा सामना केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये जेतेपद जिंकल्यानंतर व २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर २०२४ मध्ये संघ आठव्या स्थानावर राहिला. गिल आणि अप्पर दोघेही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दुबईमध्ये भारताच्या चॅम्पियन्स चषक जिंकण्याच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अय्यरने चॅम्पियन्स चषकाच्या पाच सामन्यात २४३ धावा करून भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून कामगिरी केली, तर गिलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतकही झळकावले आणि भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघाच्या गतिमानतेबद्दल, गुजरात टायटन्सची फलंदाजीची ताकद गिल व इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यांच्याकडून मिळालेल्या चांगल्या सुरुवातीवर अवलंबून असेल. मध्यम फळीची जबाबदारी वेस्ट इंडीजच्या शेर्फन रुदरफोर्ड, साई सुदर्शन व मसूद शाहरुख खान यांच्याकडे असेल, तर अष्टपैलू रशीद खान, राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि महिपाल लोमर यांच्याकडे असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, कॅगिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी व ईशांत शर्मा आदींवर असेल. फिरकी विभागाचे नेतृत्व रशीद खान व डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोर करतील.

दुसरीकडे, पंजाब किंग्ज त्यांच्या फलंदाजीसाठी कर्णधार अय्यर, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅकसवेलवर असेल. पंजाब संघाकडे अझमतुल्लाह उमरझाई, स्टोइनिस, मार्को जानसेन, शशांक सिंग आणि मुशीर खान सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत.

वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करगणार असून त्याला लॉकी फर्ग्युसन, कुलदीप सेन व यश ठाकूरची साथ असेल, तर लेग स्पिनर युजवेंद्र चहल व डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार यशस्वी हंगामाची आशा बाळगतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment