IPL Auction 2025 : थोड्याच वेळात खेळाडूंवर लागणार बोली

#image_title

IPL Auction 2025  :  आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होत आहे. या लिलावात एकूण 204 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. या लिलावात 10 संघ मिळून 641 कोटी रुपये केले जाणार आहेत. पंजाब किंग्सकडे सर्वाधिक 110.5 कोटी तर राजस्थानकडे सर्वात कमी 41 कोटी इतकी रक्कम आहे.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनला आज 24 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. एकूण 2 दिवस सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे हा मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये 577 खेळाडू असणार आहेत. एकूण 10 संघ 577 फक्त 204 खेळाडूंचीच निवड होणार आहे.

मेगा ऑक्शनमध्ये 204 खेळाडूंवर एकूण 641 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर 373 खेळाडूंच्या पदरी निराशा पडणार आहे. त्यामुळे आता कोणते खेळाडू सोल्ड होतात आणि कोण अनसोल्ड राहतात ? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी थोड्यातच वेळात मेगा ऑक्शनला सुरुवात होणार आहे. या मेगा ऑक्शनमधून 10 संघांकडून 204 खेळाडूंची निवड केली जाणार आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त 70 परदेशी खेळाडूंना घेता येणार आहे. तर त्याआधी 10 संघांनी रिटेन्शनमध्ये एकूण 46 खेळाडू कायम ठेवले आहेत.