IPL Retention 2025 । इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूला रिटेन केले जाईल आणि कोणत्या खेळाडूला रिलीज केले जाईल, यावर ३१ ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू…
विराट कोहलीचे नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कायम राखण्याच्या यादीत पहिले असेल. शिवाय यश दयाल आणि रजत पाटीदार यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेलसह अनेक हाय-प्रोफाइल खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्स…
अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे. कर्णधार ऋषभ पंतशिवाय डेव्हिड वॉर्नर, खलील अहमद यांसारखे अनेक मोठे आणि नवे खेळाडू मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकतात.
लखनौ सुपर जायंट्स…
लखनौ सुपर जायंट्स निकोलस पुरनसह मयंक यादव, रवी बिश्नोई, मोहसीन खान आणि आयुष बडोनी यांना कायम ठेवू शकतात. तर कर्णधार केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस आणि क्विंटन डी कॉक या खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकते.
गुजरात टायटन्स …
गुजरात टायटन्स संघ कर्णधार शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांना कायम ठेवू शकतो. तर मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, उमेश यादव, केन विल्यमसन या अनुभवी खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकते.
पंजाब किंग्स…
पंजाब किंग्ज संघ शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनाच रिटेन करण्याचा विचार करत आहे. अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टन यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंनाही इतर सर्वांसह मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकते, तर शिखर धवन निवृत्त झाला आहे.
राजस्थान रॉयल्स…
राजस्थान रॉयल्समध्ये कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि संदीप शर्मा यांना कायम ठेवले जाऊ शकते, तर ध्रुव जुरेलच्या नावाचीही चर्चा आहे. जोस बटलर, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विनसह उर्वरित खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये सोडले जाऊ शकते.
तुम्ही IPL 2025 Retention Ke Live कुठे पाहू शकता ?
जर तुम्हाला आयपीएल 2025 रिटेन्शन लाइव्ह मोबाईलवर पहायचे असेल तर तुमच्याकडे जिओ सिनेमा ॲप असणे आवश्यक आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर दुपारी साडेचार वाजल्यापासून सुरू होईल. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
दुपारी 4.30 पासून होणार घोषणा
IPL 2025 साठी अद्याप कोणत्याही संघाने अधिकृत घोषणा केलेली नाही. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आज दुपारी 4.30 वाजल्यापासून येण्यास सुरुवात होऊ शकते.
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो. पण त्याआधी खेळाडूंना कायम ठेवणं हा चर्चेचा विषय राहिला आहे, कारण त्याची मुदत आज संपत आहे. सर्व 10 संघांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे संध्याकाळपर्यंत अधिकृतपणे जाहीर केली जातील. यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि यावेळी मेगा लिलावात कोणता खेळाडू उतरणार हे कळेल. रिपोर्टनुसार, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांसारखे अनेक मोठे खेळाडू या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहेत.