पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच अयोध्येला जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची अयोध्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पीएम मोदी संध्याकाळी ७ वाजता राम मंदिरात रामललाला भेट देणार आहेत. यानंतर रोड शो होईल.
पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी अयोध्या जमीन वाद प्रकरणातील माजी पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झाला असून त्यांनी पुन्हा पंतप्रधान व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | On PM Modi's visit to Ayodhya, former litigant in Ayodhya land dispute case, Iqbal Ansari says, "We want Prime Minister Narendra Modi's rally in Ayodhya to be successful. Ayodhya is auspicious for PM Modi. We are ready to welcome him to Ayodhya… pic.twitter.com/JHgmJNHDqZ
— ANI (@ANI) May 5, 2024
अन्सारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अयोध्येतील सभा यशस्वी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. अयोध्या हे पीएम मोदींसाठी शुभ आहे. अयोध्येत त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.