IRCTC चं अ‍ॅप, साईट ठप्प! प्रवासी त्रस्त

नवी दिल्ली : IRCTC वरून मंगळवारी रेल्वेचे तिकीट बुक करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना टिकीट बुकिंगवेळी आणि पेमेंट करताना या अडचणी येत असल्याचे दिसत आहे. अनेकांच्या खात्यातून पैसे कापले जात आहेत मात्र तिकीट बुक होत नाहीय, अशी तक्रार यूजर्स करत आहेत.

IRCTC च्या म्हणण्यानुसार, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, प्रवाशांना IRCTC च्या अॅप आणि वेबसाईट, अशा दोन्ही ठिकाणी समस्या येत आहे.

यासंदर्भात IRCTC चे ट्विट करत म्हटले आहे, सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले आहे. IRCTC ने म्हटले आहे, “तांत्रीक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम या समस्येत सुधारणा करत आहे. तांत्रिक समस्या व्यवस्थित होताच आम्ही आपल्याला माहिती देऊ.”