मुंबई : ३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे तसतशी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणाऱ्यांची धावपळ वाढली आहे. मागील काही दिवसापासून ई-सेवा केंद्रे तसेच इंटरनेट कॅफेवर पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला दिसून येत असेल या पार्श्वभूमीवर आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक कसे करावे आणि पॅन आधारकार्डशी जोडलेले आहे की नाही हे कसे तपासावे हे पुढील माहितीच्या आधारे आपल्याला कळेल.
पॅन आधारकार्डशी जोडलेले आहे की नाही हे असे तपासा?
प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
क्विक लिंक्स अंतर्गत लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा.
पॅन व आधार क्रमांक भरा आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा.
हे दोन्ही क्रमांक संलग्न झालेले नसतील तर “PAN not linked with Aadhaar. Please click on the “Link Aadhaar” link to link your Aadhaar with PAN” हा संदेश दिसू लागेल.
दोन्ही क्रमांक संलग्न झालेले असतील तर “Your Aadhaar is linked with PAN” हा संदेश दिसेल.
प्राप्तिकर विवरण ऑनलाइन भरणा करण्यासाठी असलेल्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
लिंक आधार वर क्लिक करा.
तुमचा पॅन क्रमांक टाइप करा, आधार क्रमांक टाइप करा आणि आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुमचे नाव व अन्य तपशील भरा.
जोडणी झाल्याचा संदेश स्क्रिनवर दिसू लागेल आणि एक ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.
अशाप्रकारे तुम्हाला पॅन आधारकार्डशी जोडता येईल त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर पॅन आधारकार्डशी जोडा.