ढाका : बांग्लादेश टूरदरम्यान कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाचा सलामीवर ईशान किशनची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. या संधीचे सोनं करत ईशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ८५ चेंडूंत वन डेतील तिच्या पहिले शतक पूर्ण केले. त्यानंतरही इशानचा झंझावात कायम राहिला आणि त्याने द्विशतक झळकावून इतिहास घडविला. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन चौथा भारतीय तर सहावा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. याआधी हिटमॅन रोहित शर्माने ३ तर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी एक द्विशतक झळकावलं आहे. या तिघांव्यतिरिक्त ख्रिस गेल, मार्टिन गप्तील, फखर झमन यांच्या नावावर द्विशतक आहे.
भारताचा सलामीवीर ईशान किशनने बांगलादेशविरुद्ध २१० धावांची खेळी केली आहे. त्याचं हे वनडेतील पहिले द्विशतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत जलद द्विशतक करण्याचा विक्रम इशाननं आपल्या नावावर केला आहे. इशानने आपल्या खेळीत १३१ चेंडूंमध्ये २४ चौकार आणि १० षटकार मारले. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम २६९ धावांचा विक्रम आज विराट व इशान या भारतीय जोडीने केला. यापूर्वी १९९८मध्ये सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांनी श्रीलंकेविरुद्ध २५२ धावांची भागीदारी केली होती.
𝟐𝟎𝟎 𝐑𝐔𝐍𝐒 𝐅𝐎𝐑 𝐈𝐒𝐇𝐀𝐍 𝐊𝐈𝐒𝐇𝐀𝐍 🔥🔥
𝐖𝐡𝐚𝐭 𝐚 𝐬𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐝𝐨𝐮𝐛𝐥𝐞 𝐡𝐮𝐧𝐝𝐫𝐞𝐝 𝐭𝐡𝐢𝐬 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧.
He is the fourth Indian to do so. Take a bow, @ishankishan51 💥💥#BANvIND pic.twitter.com/Mqr2EdJUJv
— BCCI (@BCCI) December 10, 2022
वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये इशानने १७९ धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन (१८५ वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या. बांगलादेशमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम इशानने नावावर करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा ( १८५) २०११ सालचा विक्रम मोडला. विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ आणि लिटन दासने २०२०मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७६ धावा केल्या होत्या.