---Advertisement---

Big Breaking: ईश्वरलाल जैन व मनीष जैन ईडीच्या रडावर, काय आहे प्रकरण?

---Advertisement---

जळगाव : माजी खासदार ईश्वरलाल जैन व माजी आमदार मनीष जैन यांच्या आर. एल. ग्रुपवर आज गुरुवारी ईडीच्या (सक्त वसूली संचलनालय )  एका खास पथकाने धाड टाकत महत्वाची  कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

कोट्यवशीच्या कर्जबुडी प्रकरणी ही तपासणी केली जात आहे. याच प्रकरणात गेल्यावर्षी सीबीआयने देखील अशीच तपासणी केली होती. ईडीचे पथक हे जळगावसह मुंबई,  नागपूर इथं देखील तपासणी करत आहेत. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

बँक व ईडीचे मिळून एकूण 20 ते 25 कर्मचारी या ठिकाणी दाखल आहेत. ही टीम नागपूरहून पहाटे तीन वाजता या ठिकाणी दाखल झाली. कुठल्याही प्रकारच्या ग्राहकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नसून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment