ब्रेकिंग न्यूज : इसिसचा देशातील भाजप कार्यालयांवर हल्ल्याचा कट

मुंबई : इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्ला करण्यासह हिंदू नेत्यांच्या हत्या करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने अटक केलेल्या इसिसच्या मोहम्मद जोहेब याच्या चौकशीतून हा खळबळजनक खुलासा झाला आहे. याआधी रशियातील सरकारी एजेन्सी फेडरले सिक्युरीटी सर्व्हिसने दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एका आत्मघातकी दहशतवाद्याला अटक केली होती. हा दहशतवादी भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर सुसाईड बॉम्बरने हल्ला करणार होता. त्यानंतर पुन्हा एकदा भारतात अशाच प्रकारचा खळबळजनक प्लॅन उघडकीस आला आहे.

येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने सहा दिवसांपूर्वी संभाजीनगर येथून एका व्यक्तीला अटक केली होती. त्यासाठी NIA ने ९ ते १० ठिकाणी छापेही मारले होते. त्यानंतर एका व्यक्तीला अटक करून एनआयने त्याचा तपास करत कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी मोहम्मद जोहेब याच्याकडून धक्कादायाक माहिती उघड झाली. हल्ल्यासाठी पिस्तुल, स्फोटकं, सिम कार्ड उपलब्ध करून मिळाली, अशी माहितीदेखील जोहेबने दिली.

संपूर्ण देशातील भाजप कार्यालयावरती सुद्धा हल्ला करण्याचा इसिसचा प्लान ठरला होता. तसेच देशातील काही मोठ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचादेखील कट रचण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली. आहे. यामुळे तपास यंत्रणा अलर्टमोडवर आल्या आहेत. दरम्यान या खळबळजनक प्रकाराची कसून चौकशी सुरु करण्यात आली असून संशयीतांची धडपकड सुरु करण्यात आली आहे.

नेमकं काय होतं रशियातील प्रकरण

रशियाने गेल्या वर्षी एका इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतलं होतं. हा दहशतवादी सुसाइड बॉम्बर आहे. भारतातल्या एका बड्या भाजप नेत्यावर तो हल्ला करणार होतो अशी माहिती समोर आली होती.  रशियातील एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटनेने या दहशतवाद्याला महत्त्वाच्या कागदपत्रांसह रशियाला पाठवलं. त्यानंतर त्याला इथूनच भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. भारतातील सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजपच्या एका बड्या नेत्यावर सुसाईड बॉम्बरने हल्ला करण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने या अतिरेक्याचा एक व्हिडीओही जारी केला होता. हा अतिरेकी एप्रिल ते जून दरम्यान तुर्कस्तामध्ये होता, तिथेच एका इस्लामिक स्टेट नेत्याने त्याल आत्मघातकी बनण्याचे ट्रेनिंग दिले. इंस्तांबूलमध्ये त्यांच्या बैठका होत होत्या, अशी माहितीही फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिली.