ISRO : INSAT-3DS चे ‘नॉटी बॉय’ च्या माध्यमातून आज प्रक्षेपण

ISRO :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज (दि.१७) सायंकाळी ५.३५ वाजता  हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपित करणार आहे. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळावी हा या प्रक्षेपणाचा उद्देश आहे.

 

इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, ‘INSAT-3DS आज संध्याकाळी ५.३५ वाजता प्रक्षेपित होईल. हवामान आणि नैसर्गिक आपत्तींच्या अचूक माहितीसाठी ही मोहिम सुरू करण्यात येत आहे. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी तयार करण्यात आला आहे. उपग्रहांच्या इन्सॅट मालिकेतील हा तिसरा उपग्रह आहे.

 

 हवामानाची अचूक माहिती

 

GSLV F14 रॉकेटद्वारे INSAT-3DS हा हवामान उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत ठेवेला जाणार आहे. या मोहिमेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला आहे. हे प्रक्षेपण अंतराळाच्या जगात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे

 

हवामान संस्थांसाठी महत्त्वाचा 

 

INSAT-3DS हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

INSAT-3DS चे ‘नॉटी बॉय’ च्या माध्यमातून होणार प्रक्षेपण

 

हवामान उपग्रह INSAT-3DS ज्या उपग्रहातून प्रक्षेपित केला जाणार आहे, त्या GSLV F14 रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असेही म्हणतात. याचाच अर्थ खोडकर मुलगा असा आहे. GSLV F14 चे हे १६ वे मिशन असणार आहे.