ITI पास तरुणांना ISRO मध्ये नोकरीची मोठी संधी… तब्बल 1.42 लाख पगार मिळेल

विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं (ISRO)  विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते इस्रोच्या अधिकृत वेबसाईट vssc.gov.in वर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेले नाही. इच्छुक उमेदवार 4 मे 2023 पासून अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे.

एकूण पदं : 112

या पदांसाठी होणार भरती
टेक्निकल असिस्टंट : 60 पदं
साइंटिफिक असिस्टंट : 2 पदं
लायब्ररी असिस्टंट : 1 पद
टेक्निशियन-बी : 43 पदं
ड्रॉट्समॅन-बी : 5 पदं
रेडियोग्राफर-ए : 1 पद

पात्रता काय आहे?

रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. थोडक्यात, संबंधित क्षेत्रातील बीई, बीटेक, डिप्लोमा आणि आयटीआय पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क किती?
जोपर्यंत अर्ज शुल्काचा संबंध आहे, या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

पगार : निवड झाल्यावर, पगार 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना असतो.

निवड कशी होईल?
रिक्त पदांसाठी उमेदवार निवडीबाबत उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि लेखी परीक्षेनंतर कौशल्य चाचणी होईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराची निवड अंतिम मानली जाईल.