श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बहुप्रतीक्षित चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan-3) साठी सज्ज झाली आहे. इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. चार वर्षांनंतर इस्रो पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. चार वर्षांपूर्वा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
भारताचे बहुप्रतीक्षित मून मिशन म्हणजेच चंद्रयान ३ चे प्रक्षेपण उद्या १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून केले जाणार आहे. भारताच्या महत्वाकांक्षी चंद्रमोहिमेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. या पूर्वी चंद्रयान २ मोहीम ही अयशस्वी झाली होती. दरम्यान, या महिमेची रंगीत तालिम पूर्ण केल्यावर आज शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-३ चे छोटे मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेले असून त्यांनी ही मोहीम निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना देवाकडे केली.
या पूर्वी इस्रोने चंद्रावर चांद्रयान १, चांद्रयान २ पाठवले आहे. आता इस्रो चांद्रयान ३ चंद्रावर पाठवणार आहे. या ठिकाणी रोव्हर उतरवून चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास इस्रोचे शास्त्रज्ञ करणार आहेत. हे यान व्हेईकल मार्क ३ (LVM3) रॉकेटद्वारे श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. एलव्हीएम ३ मधील प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती १०० किमीच्या कक्षेत नेणार आहे. यानंतर चांद्रयान ३ हे अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.
चांद्रयान 3 सोबत यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. तर, चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल. चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये विक्रम (Vikram Lander) नावाचा लँडर आहे. विक्रम लँडर हवामानाची माहिती गोळा करण्यासाठीच्या महत्त्वाच्या उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर विक्रम लँडरचं काम संपेल आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळ करण्याचं काम करेल.
23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार
चांद्रयान-3 चं एकूण वजन 3900 किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर केल्याने चांद्रयान-3 चा खर्च तुलनेने कमी झाला आहे. चांद्रयान 2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये तर चांद्रयान-1 साठी 386 कोटी रुपये खर्च आला होता. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. दरम्यान, परिस्थितीनुसार वेळ बदलू शकते. चांद्रयान 3 चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून तेथील पृष्ठभागाचं रासायनिक विश्लेषण करणं आहे आहे. या भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यास मदत होईल.