---Advertisement---

ठाकरे गटाची गोची! मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती बारसूची जागा

---Advertisement---

मुंबई : कोकणातील बारसू रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून यामुळे वाद चिघळत चालला आहे. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी २५ महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनीच बारसूची जागा सुचवली होती अशी माहिती समोर आली आहे. यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच गोची झाली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. १२ जानेवारी २०२२ रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये १३ हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

राज्य सरकारच्या या पत्रानंतर केंद्र सरकारने रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे. यामुळे ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये या प्रकल्पावरून जुंपली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment