इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात मेगाभरती; 10वी/12वी पाससाठी सुवर्णसंधी

#image_title

इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिस दल म्हणजेच ITBP मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ITBP ने सब इंस्पेक्टर (गट बी), हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (टेलिकॉम) (गट सी) या रिक्त पदांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे एकूण 526 पदे भरण्यात येणार आहेत. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा.

भरतीसाठी पात्रता काय?
सब इंस्पेक्टर – B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
हेड कॉन्स्टेबल – 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
कॉन्स्टेबल – 10वी उत्तीर्ण

सब इंस्पेक्टर पदांसाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे आणि कॉन्स्टेबल पदांसाठी 18 वर्षे ते 23 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

इतका पगार मिळेल?
सब इंस्पेक्टरचे वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी पगार 25,500 ते 81,100 रुपये, तर कॉन्स्टेबलच्या भूमिकेसाठी 21,700 ते 69,100 रुपये पगार असतो.