Jagdish Rathore : शिक्षकाचा अभिनव उपक्रम; गरीब अन् गरजू विद्यार्थ्यांसाठी आपणस ‘पालक’

सोयगाव : तालुक्यातील पळाशी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक जगदीश राठोड हे गेल्या अनेक  वर्षापासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी स्व: खर्चाने शालेय साहित्य वाटप करीत असतात. यात चार रेघी वह्या, शालेय पॅड, कंपास पेटी, शालेय दप्तर, पेन अशा विविध साहित्यांची भेट आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना देत असतात. यात कित्येक विद्यार्थी अनियमित असताना बक्षीस मिळाल्यामुळे ते नियमित शाळेत येऊन गुणवत्ता द्यायला लागले आहे. शिवाय शालेय परिसरात झाडांची योग्य निगा राखण्यासाठी स्वखर्चाने जाळी आणून वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील केले जात आहे.

शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांचा गरीबीची परिस्थिती असल्यामुळे घरी वाढदिवस कधीच साजरा झाला नाही, अशा विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत शिक्षक जगदीश राठोड  स्वखर्चाने साजरा करतात . असे वेगवेगळे उपक्रम झाल्यामुळे भावुक झालेले विद्यार्थ्यांचे पाणवलेले डोळे मला ही कार्य करण्याची ऊर्जा देत असतात असे भावपूर्ण विधान जगदीश राठोड यांनी केले.

याप्रसंगी शालेय शिक्षण समिती शिक्षणप्रेमी भागवत कराळे यांनी देखील जगदीश राठोड यांचे कौतुक केले. आमच्या शाळेत अशा प्रकारचे विविध उपक्रम शिक्षक राबवतात याचा मला सार्थ अभिमान असल्याचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी सांगितले.

मी भागवत आनंदा कराळे, शालेय समिती शिक्षक प्रेमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, मी काही काही वर्षापासून बघतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळाशी येथील शिक्षक माननीय गुरुवर्य राठोड सर हे स्वखर्चाने आपल्या पळाशी येथील शाळेत गरजू गरीब व हुशार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने स्वतःच्या पगारातील पैशाने मुलांना साहित्य वाटप असतात काय मन असेल या शिक्षकाचे किती उदारदायित्व असेल यांच्या अंगात खरच यांच्या बद्दल बोलावं तितकं कमीच…