---Advertisement---
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम दर चार महिन्यानंतर आणि ३ हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दिली जाते.आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता १४ हप्ते जमा झाले आहेत.
आता केंद्र सरकारने १५ व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू केली आहे.सरकारने पीएम किसान योजनेसंदर्भात अनेक नियम लावले आहेत. या नियमांचे पालन करणे सक्तीचे झाले आहे.जर शेतकऱ्यांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावरती कारवाई होण्याची वेळ येऊ शकते.
जाणून घेऊया अपात्र शेतकरी कोण आहेत?
१}पीएम किसान वेबसाइटनुसार, काही शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
२)सर्व संस्थागत जमीनधारक शेतकरी
३}कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी
४}घटनात्मक पदांवर असलेले लोक
५}माजी आणि सध्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा यासारखे लोक
६}सरकारी पदांवर काम करणारे कर्मचारी
७}लोकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते
८}आयकर भरणारे शेतकरी
९}डॉक्टर, इंजिनीअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांनाही याचा लाभ घेता येणार नाही