जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने लाखोंचा अवैध पानमसाला पकडला. ही कारवाई २८ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरात करण्यात आली. या प्रकणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामचंद्र भरकड यांना सदर प्रकरणी गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्या सहकाऱ्यांसह मुक्ताईनगर परीसरात ठिकठिकाणी शिताफीने सापळा रचला. दरम्यान २८ रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर-मलकापुर हायवे वरील पिंप्री आकाराऊत जवळील हाॅटेल ओम साई जवळ वाहन महिंद्रा बोलेरो पिक अप क्र.एम एच २० जीसी २९६७ थांबवुन बघितले असता,प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाला व जाफरानी जर्दा असा एकुण १३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल व वाहन अंदाजित किंमत ४ लाख ५० हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी वाहन चालक सचिन भीमराव कोलते (वय-३३), क्लिनर सुभाष रंगनाथ कनसे (वय-४५) दोघे रा.दिपक लान समोर हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पानमसाला अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेत वाहन व दोघा आरोपींना मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात असुन पुढील तपास एपीआय प्रदिप शेवाळे करीत आहे.