Crime News : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला असून, त्यातुन ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून धरणगाव पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर तो अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील एका गावात पीडीता व तिची आई ऊस तोड कामासाठी गेले असता तेथे 1 फेब्रुवारी ते 4 एप्रिलच्या दरम्यान सागर संजय मोरे (23, रा.मोढारे, प्रिंप्री प्र.ऊ., ता.पारोळा) याने ओळखीचा फायदा घेत पीडीतेच्या राहण्याच्या झोपडीत वेळोवेळी तिच्या सोबत शारीरीक संबंध ठेवले. त्यातून पीडीता गरोदर राहिली. ही घटना कुणालाही सांगितली तर मरुन जाईल, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास अडावदचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.