भुसावळ : शहरातील विविध भागात नशेच्या आहारी गेलेले गुन्हेगार चिलीमद्वारे गांजा फुकल्यानंतर गुन्ह्यांकडे वळत असल्याने या प्रकारांना पायबंद लागण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी दिवसभरात आठ संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे नशेखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नूतन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहायक निरीक्षक मंगेश गोंटला, सहायक फौजदार सत्तार शेख, हवालदार विजय नरेकर, सुनिल जोशी, निलेश चौधरी, उमकांत पाटील, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, अतुल कुमावत, सचिन चौधरी, हेमंत जागडे यांच्या पथकाने कारवाई केली.
अन्सार अहमद शेख उस्मान (28, जाम मोहल्ला, मशीदीजवळ), अशोक डेमा सपकाळे (46, रा.दिनद्याल नगर), यादव भिका खंडारे (48, रा.इंदीरा नगर), राजेश देविदास बिर्हाडे (45, महात्मा फुले नगर), विजय पुंजाजी कांडेलकर (40, मोतीराम नगर, शिरपूर कन्हाळा रोड, भुसावळ) मोहन देविदास सोनवणे (41, गोजोरा, ता.भुसावळ), शाहीद असलम गवळी (21, रा.जाम मोहल्ला, मशिदीजवळ), राम बाबू मेश्राम (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार स्वतंत्रव् गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुंगीकारक नशेचे पदार्थ वा गांजा बेकायदेशीरपणे बाळगून त्याचे सेवन करणारे नागरीक दिसल्यानंतर त्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना (222399) वर द्यावी, अथवा बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गायकवाड व डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी केले आहे.