जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासोबतच राष्ट्रवादीच्या इतरही पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिंदे-फडणवीसांना जळगाव येथे काळे झेंडे दाखवणार असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.