Jalgaon : शेतात पार्टी करताना रंगला वाद; पोलीसांना कळालं; आले आणि कोयता, तीन दुचाकी…

Crime News : शेतात पार्टी करताना जोरदार वाद झाले. पोलिसांना माहिती कळवल्यानंतर संशयिताना ताब्यात घेण्यात आले. कोयता जप्त करण्यात आल्यानंतर आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलीस कोठडीत संशयितांनी त्याच्याकडील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. जामनेर तालुक्यात हा प्रकार घडला.

अजय सुकलाल अहिरे (30, यशवंत नगर, चंदन नगर, पुणे, दीपक दादाराव शिरोळे (23, बालाजी नगर चाकण, पुणे) व शुभम उर्फ गौतम दीपक तायडे (22, सामरोद, ता.जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जामनेर तालुक्यातील सामरोद गावाजवळील एका शेतात संशयितामध्ये जोरदार वाद झाले. त्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाल्यानंतर प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वात पथकाने संशयितांना ताब्यात घेत कोयता जप्त करीत गुन्हा दाखल केला मात्र पोलीस कोठडीत संशयितानी दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन चोरलेल्या पल्सर तसेच पुण्यातून लांबवलेली अ‍ॅक्टीव्हा जप्त करण्यात आली.

चोरीबाबत गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल असून संशयित सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाले आहेत. आरोपींना सध्या 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यानंतर नाशिक पोलीस त्यांना गुन्ह्यात अटक करणार आहेत. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल घुगे, अमोल वंजारी, जनार्दन सोनवणे, निलेश घुगे आदींच्या पथकाने केली.