जळगाव : शहरातील शिरसोली गावाजवळल भरधाव कारचा ताबा सुटल्याने थेट कार थेट झाडावर आदळली. या अपघातात कार चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले. आनंदा शांताराम सोनवणे ( ३९ रा. कासमवाडी, जळगाव ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात आनंदा सोनवणे हा कुटुंबियांसह वास्तव्याला होता. रविवार, १४ रोजी दुपारी आनंदा हा त्याचा मित्र भैरव राणे आणि पप्पू आढाव यांच्यासोबत जेवण करण्यासाठी शिरसोलीजवळील एका हॉटेलवर गेला होता.
दरम्यान, जेवण आटोपून घरी परतत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर त्यांची कार आदळली. या अपघातात आनंदा सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले भैरव राणे आणि पप्पू आव्हाड हे गंभीरित्या जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.