Jalgaon Big Breaking : काँग्रेसची मोठी कारवाई , जळगावातील या तीघांना केले निलंबीत

Jalgaon Big Breaking : काँग्रेसचे निष्ठावान असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व देवेद्र मराठे यांच्यावर प्रदेशाध्य नाना पटोले यांनी मोठी कारवाई केली. या तिघांना आज सोमवार, 22 रोजी काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबत करण्यात आले आहे.

प्रांताध्यक्ष्ा नाना पटोले यांच्या सूचनेवरुन काँग्रेसचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष्ा नाना गावंडे यांनी तसे पत्र काढले आहे.

अनेकदा निलंबन तरीही पक्ष्ाातच
डॉ. उल्हास पाटील यांनी पक्ष्ााकडे निवडणूकीसाठी तिकिट मागीतले होते. ते न मिळाल्याने त्यांनी अपक्ष्ा म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु नंतर पुन्हा त्यांचे निलंबन रद्द करून त्यांच्यावर पक्ष्ााची मोठी जबाबदारी देण्यात आली होती.

रावेर तालुक्यातील विवरे गावातील एका शेतकरी कुटुंबात उल्हास पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासून कुशाग्र बुद्धमत्ता लाभलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची पदवी घेऊन जळगावात वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. घरात राजकारणाचा गंधही नव्हता. त्यामुळे त्या वाटेला जाणे शक्यच नव्हते; परंतु माजी मंत्री (कै.) बाळासाहेब चौधरी यांच्यामुळे ते सन १९७८ मध्ये तरुण वयातच काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. सुरुवातीला ते पुणे जिल्हा युवक काँग्रेस सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. यावेळी त्यांच्यातीले नेतृत्वगुण ठळकपणे समोर आले. तेंव्हापासून ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते निवडून देखील आले मात्र त्यांना केवळ १३ महिन्यांची खासदारकी मिळाली. १३ महिन्यांच्या खासदारकीनंतर सन १९९९ मध्ये ते पराभूत झाल्यानंतर २००४ मध्येही त्यांनी काँग्रेसतर्फे कडवी लढत दिली, अवघ्या वीस हजार मतांनी ते पराभूत झाले. सन २००७ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सन २००९ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर २०१४ मध्येही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली. मात्र, त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होती. काँग्रेसने या जागेची मागणी केली. मात्र राष्ट्रवादीने लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना उमेदवार न मिळाल्याने अखेर पक्षाने ही जागा काँग्रेसला सोडली. काँग्रेसतर्फे डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र जळगाव जिल्हा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये डॉ. उल्हास पाटील यांचे मोठे वजन आहे. काँग्रेस पक्षात कितीतरी चढ उतार आले तरी त्यांनी काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याने त्यांच्या कार्याची दखल दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी घेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली.

या कारणासाठी केले निलंबित
डॉ. उल्हास पाटील हे त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासाठी रावेर लोकसभेसाठी इच्छूक आहेत. पक्ष्ााकडून तिकिट मिळणार नसल्याची शक्यता पाहता मुलगी डॉ. केतकी या भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे डॉ. उल्हास पाटील हहि आता भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.