---Advertisement---

Jalgaon Crime News : फुटेजच्या आधारे घरफोडीची उकल, आरोपीला धुळ्यातून अटक

---Advertisement---

जळगाव : भरदिवसा बंद घर फोडत चोरट्यांनी रामानंदनगरातून १३ लाखाहून अधिक र क्कमेचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि धुळे जळगाव एलसीबीचे सहकार्य घेत रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवार, २८ रोजी धुळे येथील संशयित साहील प्रवीण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख (वय २०, रा. पश्चिम हुडको चाळीसगाव रोड पवननगर धुळे) याला त्याच्या राहत्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेतले.

रामानंदनगर प्लॉट नं. १२ येथे पराग जगन्नाथ चौधरी (वय ४८) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ते घराच्या दरवाजाला कुलुप लावून बाहेर गेले होते. दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडुन कपाटातील व डब्यातील २२ तोळे सोने व ४५० ग्रॅम चांदीचे दागिने १६ हजार ५०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी रामानंदनग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात घटना घडली त्या परिसरापासून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित मोपेड गाडीवर संशयितरित्या वावरताना पोलिसांना दिसुन आला. त्याचा फोटो शहरातील माहितगार व्यक्तींना दाखविला असता तो शहरातील नसल्याचे समजले.

फुटेज तपासण्यावर लक्ष केंद्रीत
भुसावळ टोलनाका, पारोळा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पारोळा टोल नाक्यावर संशयित इसम पोलिसांना दिसला. या आरोपीसंदर्भात पारोळा, अमळनेर धुळे परिसरात माहितगार इसमांकडे विचारपुस केली असता संशयिताचे नाव साहिल प्रविण झाल्टे असुन तो घरफोडीतील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले. त्याच्या घरी वेळोवेळी जावून संशयित पथकाला मिळाला नाही. पोनि राजेंद्र गुंजाळ यांनी एलसीबी जळगाव, धुळे यांचे सहकार्य घेत तपासाला गती दिली. त्यानंतर साहिल याला चाळीसगाव रोडवरील पवननगर येथुन ताब्यात घेतले. घरातूनच त्याने चोरलेले चांदीचे दागिने पोलिसांना काढून दिले. चोरलेले सोने हे त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने वितळवले अशी कबुली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी पवनराज संजय चौधरी (वय २८, रा. पारोळा), सागर वाल्मीक चौधरी (वय ३० रा. पारोळा), केशव बाळु सोनार (वय ३६, रा. अमळनेर) यांना अटक केली. पथकाने सुमारे १२ लाख ५ हजार ४४१२ किमतीचे १५९.९२ ग्रॅम सोने, ३५ हजार किम तीचे ४०७.७७ ग्रॅम चांदीचे दागिने, ५० हजार किमतीची मोपेड, ५० हजार किमतीचा आयफोन असा एकुण १३ लाख ४० हजार ४४१ रुपयंचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर तो आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत तक्रारदार पराग जगन्नाथ चौधरी यांच्या स्वाधीन केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment