Jalgaon City Municipal Corporation: गेल्या पाच ते सहा वर्षापासून मालमत्ताकरांची थकबाकी न भरणाऱ्या 480 जणांच्या मालमत्ताचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली होती. मात्र त्यांना शेवटची संधी म्हणून 4 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत अभय शास्ती योजना राबविली होती. यात अजुन मुदतवाढ देत ती 31 डिसेंबरपर्यंत केली आहे. आतापर्यंत 12 कोटी रूपयांचा भरणा झाला.
सलग पाच ते सात वर्षापासून शहरातील सुमारे 480 जणांनी मालकत्ता कराचा भरणा केलेला नव्हता. त्यांना मालमत्ता करांचा भरणा करण्यासाठी मनपाने अनेक संधी दिल्यात. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष्ा केले.
लिलावाचा पत्करला मार्ग
मनपाने दिलेल्या नोटीसा व संधींकडे दुर्लक्ष्ा करणाऱ्या 480 जणांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी घेतला. या सर्वांची नावे जाहिर करून त्यांच्या मालमत्ता लिलावात काढल्यात.
धाबे दणाणले
आपल्या मालमत्तांचा लिलाव होणार असल्याचे पाहत थकबाकदारांचे धाबे दणाणले. त्यानी आयुक्तांची भेट घेत शास्ती माफीची योजना राबवली तर थकबाकी भरण्यास संमती दर्शविली. त्यामुळे अभय शास्ती योजना राबवली.
15 दिवसात 12 कोटी जमा
480 थकबाकीदारांसाठी राबविलेल्या या योजनेत 15 दिवसात 12 कोटीचा भरणा करण्यात आला. मुदतीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 3 कोटींचा भरणा करण्यात आला.
मुदतवाढीचा लाभ घ्यावा
थकबाकीदारांना 100 टक्के अभय शास्ती योजना राबविली. या संधीचा अजुन लाभ घेण्यासाठी या अभय शास्ती योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात उर्वरीत थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाचा निर्णय घेणार आहे.
डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, मनपा