जळगाव शहरातील सर्वात खड्डेमय या रस्त्याचे काम मार्गी

जळगाव : जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांचा विषय जळगावकरांसाठी नवा नाही. शहरातील खड्ड्यांचा विषय चेष्टेवरुन संताप व संतापावरुन आता सहनशिलतेवर येवून ठेपला आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्ते खड्डेमय झाले असतांना सर्वात खराब रस्ता म्हणून ईच्छादेवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची ओळख आहे. हा रस्ता कुणी करायचा यावरुन महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. मात्र आता या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेज जाणार्‍या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मंत्री गिरीशभाऊ महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर करुन घेतल्याचे राजूमामा यांनीस सांगितले. आता निधीची अडचण मी सोडवली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता बनवायला हवा अशी अपेक्षा यावेळी आमदार भोळे यांनी व्यक्त केली.