जळगाव : मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना नांद्रा खुर्द येथे घडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र अशोक सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात ४५ वर्षीय महिला या आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. शेती मजुरीचे काम करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास महिला या घरात एकट्या असताना गावात राहणारा संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे हा महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला.
महिलेच्या भावाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत हे करीत आहे.