Jalgaon Crime : नात्याला काळिमा फासणारी घटना ; चुलत भावानेच मित्रांसोबत केला बहिणीवर अत्याचार

---Advertisement---

 

Jalgaon Crime जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या चुलत भावासह त्याच्या दोघा मित्रांनी अत्याचार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील तांबोली खुर्द या गावात घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. या गावातील एका 16 वर्षीय मुलीवर चुलत भावासह इतर दोघांनी अत्याचार केला. या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक शोषण केले. यातून अल्पवयीन गरोदर राहील्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील तांबोली खुर्द या गावात विकास 16 वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. चुलत भाऊ याने तीन ते साडेतीन महिन्यापूर्वी दत्तू पाटील यांच्या शेतात नेऊन चुलत बहिणीवरच अत्याचार केला.

त्यानंतर आरोपी दीपक नाना मोरे व रावसाहेब मोरे यांनी देखील अल्पवयीन पिडिता घरी एकटी असताना आळीपाळीने अत्याचार करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीता तीन महिन्याची गरोदर आहे. पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ दादाभाऊ सोनवणे, दीपक नाना मोरे व रावसाहेब मोरे (राहणार तांबोली खुर्द चाळीसगाव) ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---