जळगाव : जळगाव जिल्हयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून संशयित खाली शहा याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या भुसावळ शहरात ही घटना घडली. शहरातील एका भागात २८ वर्षीय तरुणी वास्तव्याला आहे. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून ती आपला उदरनिर्वाह करते. दरम्यान, १५ मे २०२३ रोजी या तरुणीची ओळख खालीच शहा सलीम शहा रा.जामनेर रोड, भुसावळ याच्याशी झाली. खाली शहा याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
जेव्हा पीडित तरुणीने खाली शहाला लग्नाची विचार केली असता, त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संशयित आरोपी खालील शाह सलीम शाह रा.जामनेर रोड भुसावळ याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.