जळगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय महिलेवर एकाने जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच गावात राहणारा संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन याने 26 जानेवारी ते 26 मे दरम्यान महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून शिरपूरसह इतर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी पीडित महिलेने धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार मंगळवारी 28 मे रोजी मध्यरात्री एक वाजता संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ हे करीत आहे.