---Advertisement---
जळगाव : राज्यात महिलांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जळगावात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेचे सेवापुस्तक भरण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या फिर्यादीनुसार, परिवहन महामंडळामध्ये २००८ पासून एक महिला कार्यरत असून, त्याच ठिकाणी जुलै २०२४ पासून रामलाल पवार हा वरिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहे. सुरुवातीला त्याने महिलेच्या मोबाइलवर असभ्य भाषेत मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेवापुस्तिका भरण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार वर्षभरापासून सुरू होता.
याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वरिष्ठ लिपिक रामलाल निवृत्ती पवार (रा. वाघनगर) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
---Advertisement---
३० लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : लग्नात झालेला खर्च मिळावा म्हणून माहेरून ३० लाख रुपये आणावे, यासाठी जयश्री विवेक साळुंखे (२२) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. हा प्रकार जून २०२४ पासून सुरू होता. या प्रकरणी विवाहितेने मेहुणबारे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून पती विवेक गोविंद साळुंखे याच्यासह सासरच्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.