प्रतीक्षा संपणार! जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा IMD चा अंदाज..

जळगाव । गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने २० ते २१ जुलैपर्यंत हे क्षेत्र तीव्रतेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सातपुडा व उत्तरेच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५० मिमीहून अधिक पाऊस झाला. यात मागील दोन तीन दिवसापासून जिल्ह्यातील काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहे. या पावसाचा खरिपाच्या पिकानं मोठा आधार मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पावसाची अवाक न झाल्याने खाली आहेत. यामुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.

याच दरम्यान, आता राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. यातच उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची स्थिती तयार झाली आहे. तसेच तीव्रतेत ही स्थिती विदर्भाच्या दिशेने जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दिशेने सरकत आहे.यामुळे जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

जळगाव तालुक्यासह भुसावळ, जामनेर, चोपडा या तीन तालुक्यांत २५ ते ३५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांसह सातपुड्याच्या पट्टयात ६० ते ९० मिमीपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे. मात्र यांनतर त्यानंतर २२ ते २८ जुलैदरम्यान जिल्ह्यात पावसाचा ब्रेक राहण्याचा अंदाज आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने आज कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्हे, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.