---Advertisement---
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६९ हजारांवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २३ हजार रुपयांवर पोहोचले आहे.
गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात मोठी वाढ सुरू आहे. ९ ऑक्टोबर रोजी ११ हजार २०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात १० रोजी पुन्हा तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. ११ ऑक्टोबर रोजीदेखील ही भाववाढ कायम राहत चांदी पुन्हा दोन हजार रुपयांनी वधारली.
त्यामुळे चांदी एक लाख ६९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २३ हजार रुपयांवर पोहोचले आहे.
बातमी अपडेट होत आहे









