जळगाव । सोने चांदी दरात चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. ऐन लग्नसराईत दोन्ही धातूंच्या किमतीत महागल्या आहे. यामळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले. दरम्यान, गेल्या चार दिवसांत सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर ६३ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. दि. ५ डिसेंबरनंतर सोने पुन्हा एकदा ६३ हजारांच्या पुढे गेले असून, आठ दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी ३०० रुपयांची वाढ होऊन ती ७५ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दि. ४ डिसेंबर रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ३०० रुपये प्रति तोळा होऊन ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी दि. ५ डिसेंबर रोजी एक हजार 300 रुपयांची घसरण होऊन ते ६३ हजार रुपयांवर आले होते.
दि. ६ डिसेंबर रोजी पुन्हा घसरण होऊन सोने ६३ हजार रुपयांच्या आत आले होते. तेव्हापासून त्यात किरकोळ चढ- उतार होऊन दि. १९ डिसेंबर रोजी ते ६२ हजार ६०० रुपयांवर आले होते, त्यानंतर मात्र त्यात वाढ सुरू होऊन दि. २० डिसेंबर रोजी सोने ६२ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
२१ रोजी स्थिर राहिल्यानंतर २२ रोजी सोन्यात २०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ६३ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. दुसरीकडे आठ दिवसांपासून चांदी ७५ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर होती. मात्र शुक्रवारी तिच्याही भावात ३०० रुपयांची वाढ झाली व चांदी ७५ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.