---Advertisement---
जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ कायम असून सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १९ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच चांदीच्या भावात एक हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५० हजार ६०० रुपयांवर पोहोचली आहे.
दोन महिन्यांपासून किरकोळ अपवाद वगळता सोने-चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे. त्यात शनिवारी ९०० रुपयांची वाढ होऊन एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावात सोमवारी बाजार सुरू होताच एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने एक लाख १९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
दुसरीकडे शनिवारी दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन एक लाख ४८ हजार ८०० रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात सोमवारी एक हजार ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख ५० हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
अमेरिकन फेडरल बँकेचे कमी होणारे व्याजदर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे सोने-चांदीचे भाव वाढत असल्याचे जळगाव सुवर्ण बाजार असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सांगितले.
महिनाभरात सोने १३,००० तर चांदी २६ हजारांनी वधारली
गेल्या महिनाभरातच सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सोने एक लाख सहा हजार २०० तर चांदी एक लाख २४ हजार ५०० रुपयांवर होती. महिनाभरात सोने १२ हजार ९०० रुपयांनी वधारून एक लाख १९ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी २६ हजार १०० रुपयांनी वधारून एक लाख ५० हजार ६०० रुपयांवर पोहोचली आहे.









