---Advertisement---

Gold Rate : सोने स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या दर

---Advertisement---

Gold Rate : चीन आणि अमेरिकेतील व्यापारी तणाव कमी झाल्यामुळे, गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूक करण्याऐवजी इतर पर्याय शोधत आहेत. यामुळे सोने आणि चांदीच्या दरात सलग दोन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया आजचे सोन्याचे नवीन दर काय आहेत.

जळगावच्या सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी घसरून ८५,०७० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १३०० रुपयांनी घसरून ९२८०० (जीएसटीसह ९५५८४) रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आले; तर चांदीच्या दरातही २ हजारांची घसरण झाली आहे. यांनतर आता चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९६००० रुपयापर्यंत पोहोचले आहे.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९५,२८० रुपये दराने तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,१३० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,२०० रुपयांवर आहे.

कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९५,१३० रुपये दराने, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,२०० रुपये आहे. जर आपण चेन्नईबद्दल बोललो तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,१३० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरा बद्दल बोललो तर दिल्लीत ९७ हजार रुपये प्रति किलो दराने, कोलकातामध्ये चांदी ९७ हजार रुपये प्रति किलो, तर चेन्नईमध्ये १,०८,००० रुपये प्रति किलो आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment