Jalgaon Heavy Rainfall Crop Damage । जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; शेकडो हेक्टर…

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. रविवार, २९ रोजी सकाळपासून उघडीप दिली असून तापमान कमाल ३२ ते किमान २४ अंश तसेच हवेतील आर्द्रता ७५ टक्के आहे. गत सप्ताहातील सलग चार दिवसात वादळी व जोरदार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. परिणामी कापणी झालेल्या वा काढणीस आलेल्या उडीद, मूग, मका आदी हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे खरीप हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, २४ व २८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे शेतपिकांसह वीज पडून पशुधन हानी झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांतर्गत कृषी, महसूल विभागाला देण्यात आले असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

शहरासह जिल्ह्यात चार-पाच दिवसांत अचानक जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. यामुळे शहर परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून परिसर जलमय होत आहे, तर शेतशिवारात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

सप्टेंबरमध्ये कापसाला फुले लागून कापसाची बोंडे तडवून कापूस वेचणीसाठी शेतकरीवर्गाची लगबग सुरू असते. मात्र, अतिपावसामुळे फ ते व बोंडे गळून पडू लागली आहेत. काही ठिकाणी कापसाची बोडे काळी पडली आहेत, केळीचेही नुकसान झाले आहे.

तर बऱ्याच शेतशिवारात कापणी व खुडलेला मका कणसे पावसात भिजत्यामुळे तसेच जमीनीतील उष्णतेमुळे कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली असून हाती आलेले शेतउत्पादन वाया जाण्याची भिती वर्तविली जात आहे. या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सुमारे ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस व केळी पिकाचे झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

नैसर्गिक आपत्तीत शेकडो हेक्टर शेतपिकांचे नुकसान
जिल्हा प्रशासन, कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून महसूल विभागांतर्गत मंडळ व तलाठी तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, कृषी सहायक आर्दीकडून शेतशिवारात पिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतशिवारात ग्रामीण स्तरावर सुमारे २५च्या वर गावे बाधित असून नुकसानग्रस्त शेतकरी संख्या ७५६ आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव व रावेर तालुक्याला बसला असून कापूस २९४, ज्वारी ६०, मका ५५.५२, तूर १२, फळबाग ६०, केळी ६२ असे सुमारे ५१५ हेक्टर तसेच जळगाव आणि पाचोरा तालुक्यात सुमारे ३५ ते ४० हेक्टर वरील शेतपिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज नोंदविला आहे.

नैसर्गिक आपत्तीत ७ जणांचा मृत्यू तर ३७ दुधाळ पशुधनाची हानी
तसेच नैसर्गीक आपत्तीत जामनेर तालुक्यात ६ तर भडगाव तालुक्यात १ अशा ७ जणांचा मृत्यू झाला असून रावेर ५ आणि यावल १ असे सहा जण जखमी झाले आहेत. याशिवाय जळगाव १. जामनेर तालुक्यात ६. पारोळा १, भुसावळ १५, मुक्ताईनगर, भडगाव आणि यावल तालुक्यात प्रत्येकी एक असे २६ मोठ्या तसेच जामनेर ८. पारोळा २, मुक्ताईनगर ३ आणि पाचोरा १० असे २३ लहान अशा एकूण ४९ दुधाळ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जामनेर, भुसावळ आणि भडगाव येथे प्रत्येकी १ तर अमळनेर आणि धरणगाव तालुक्यात प्रत्येकी दोन असे ७ शेतीपयोगी ओढकाम करणाऱ्या पशुधनाची हानी झाली आहे.

मातीच्या व पक्क्या घरांची पडझड
याशिवाय संततधार व मुसळधार पावसामुळे जळगाव ४. जामनेर २०, एरंडोल २. बोदवड ४३. मुक्ताईनगर १०, अमळनेर १४१, चोपडा ४, पाचोरा ८, मडगाव २२. रावेर २, यावल ५ आणि चाळीसगाव १० असे २७१ कच्च्या घरांचे अशंता नुकसान झाले आहे. तर रावेर ४ आणि चाळीसगाव तालुक्यात १ असे ५ पक्क्या घरांचे अंशता नुकसानीचे पंचनामे स्थानिक तलाठी व मंडळ पातळीवर करण्यात आले असत्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या जोरदार पावसामुळे कापणी झालेल्या व काढणीस आलेल्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात संबंधीत महसूल तसेच कृषी विभागास आदेश देण्यात आले आहेत तसेच वीज पडून पशुधनहानी वा घरांची पडझड आदीचे देखील पंचनामे करण्यात आले असून प्राप्त पंचनामा अहवाल विभागीय आयुक्त यांचेस्तरावर पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल.