जळगावला आजपासून पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’‎ जारी

जळगाव । उद्या म्हणजेच 5 जून पर्यंत मान्सून केरळात धडकण्याची शक्यता असून त्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातमधील तापमानात बदल पाहायला मिळतोय. सध्या उन्ह-सावलीचा खेळ पाहायला मिळत असून त्यामुळे तापमानाच्या पारामध्ये किंचित घट झाली आहे. दरम्यान, आज पासून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’‎ जारी करण्यात आला आहे. आज रविवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तुरळक तर काही‎ ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.‎ मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यभरात सक्रिय‎ होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत. हवामान‎ अभ्यासक पंजाबराव डक यांच्या माध्यमातून‎ देखील खान्देशातील तीनही जिल्ह्यात 3 ते 8 जून‎ दरम्यान पावसाची शक्यता वतर्वण्यात आली‎ आहे. शनिवारी दिवसभर उन्ह-सावलीचा खेळ‎ सुरू होता. शनिवारी 41.9 अंश सेल्सिअस‎ कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.‎