Jalgaon खान्देश फिल्मी मिटअप : मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन – डॉ.केतकीताई पाटील 

jalgaon  – सोशल मिडीयावरील व्हिडीओच्या माध्यमातून आपली खान्देशी संस्कृती संपूर्ण जगभरात पसरत आहे . महाविद्यालयीन दशेत असतांना अभ्यासासोबतच रिल्स, यू ट्यूबचे विविध कंटेटवर आधारित व्हिडीओ तुम्ही बनवित आहात, उद्याच्या उज्जवल देशाचे भवितव्य घडविण्यासाठी तुम्ही तत्पर असून मनोरंजनाद्वारे संस्कृतीचे संवर्धन तुम्ही करीत असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले.
गोदावरीअंतर्गत  डॉ.केतकी पाटील फाऊंडेशन व आर स्ट्रेमिंग यांच्या संयुक्‍त विद्यमाने मंगळवार  २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअपचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील ह्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केसावर फुगे फेम सचिन कुमावत यांच्यासह डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, हे उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मास्टर क्लास ही भरविण्यात आला असून यात कंटेंट निर्माण करणाऱ्या कलावंतांनी संवाद संवाद साधला.
 आर straming चे सी ई ओ गौरव नाथ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,  खानदेशातील कंटेंट क्रिएटर चे एकत्रीकरण करणे हा उद्देश आहे. मन्हा देश, मन्हा खान्देश , जय खान्देश या घोषणेने मास्टर क्लास ला सुरवात झाली. मास्टर क्लास सत्रात व्हिडिओ बनविताना येणाऱ्या अडचणी, कुटुंबीयांचे सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश होता.
मान्यवरांच्या हस्ते ६० हून अधिक कलावंताचा स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
  पुणे, मुंबई, नाशिक येथे असे कार्यक्रम खूप होतात परंतु जळगाव येथे पहिल्यांदाच झाला आहे. या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील असे आश्वासन डॉ. केतकीताई पाटील यांनी दिले.
 .आर स्ट्रीमिंग च्या माध्यमातून पैजण ही वेब सिरीज येणार आहे.खानदेशातील कलाकारांच एकत्रीकरण दिसून येणार असल्याचे गौरव यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य बिरहादे, रेणुका जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ प्रशांत वारके यांनी मानले. यावेळी डॉ नीलिमा वारके यांच्यासह कलावंत उपस्थित होते.
यांचा झालं सन्मान
 यावेळी समृध्दी पाटील, विजय पाटील, संजय सोनवणे, कल्याणी निकम, पुनम पाटील, अजय कुमावत, मीना चंद्रकांत भिरुड, आकाश राठोड, साक्षी चित्ते, विकास बागुल, माही सुर्वे, कृतिका महादू, जय ठाकरे,परमेश्वर सुरवाडे, नितीन धनगर, रोशन माळी, भूषण राजपूत, अनिल नेरकर, राहुल सुर्यवंशी, धनराज मराठे, ऋषी सोनवणे, विजय सुरेश पाटील, भाग्यश्री भिरुड, सागर राजपूत, चंद्रकांत इंगळे, भूषण राजपूत, आदींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.