जळगाव LCB ची मोठी कारवाई, उसळला लाखोंचा गुटखा तस्करीचा डाव

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : शहरापासून जवळच असलेल्या पुर्णाडफाटावर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने लाखोंचा गुटखा जप्त केला. आज, बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती नाकाबंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुर्णाडफाटावर नाकाबंदी केली असता, एका आयशर ट्रकमध्ये गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला.

ट्रकमधील चालकाकडे गुटखा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कुठलाही परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी चालकाला
ताब्यात घेतले असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अवैध गुटख्याचा साठा, वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---