Jalgaon Lok Sabha : जळगाव लोकसभेच्या तिसऱ्या टर्मसाठी भाजपाच्या या माजी खासदाराचा दिल्लीत ठिय्या

 Jalgaon Lok Sabha : जळगाव लोकसभेच्या  तिसऱ्या टर्मसाठी भाजपाच्या   माजी खासदाराने  दिल्लीत ठिय्या दिला आहे.  सन 2019 मध्ये  अन् खासदारकीची उमेदवारी निश्‍चित होती, परंतु एका  क्लीपमुळे  सगळे पारडेच फिरले आणि अन् खासदारकीच्या हॅटट्रीकचा विक्रम करण्याची संधीही हुकली.

 

पक्षाच्या अंतर्गत स्पर्धेतून  ही क्लीप व्हायरल झाल्याचीही चर्चा होती. त्यांनतर काही काळ ते अज्ञात वासातही होते . परंतु आता पुन्हा पाटील यांनी पक्षाकडे जळगाव लोकसभेचे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करत  दिल्लीत ठिय्या दिला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकिसाठी सध्या ते दिल्लीत आहेत. तेथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठाकडे उमेदवारीबाबत दावा केल्याची माहिती समोर आली आहे.

 

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार ए.टी.पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून सलग दोन पंचवार्षिक मध्ये निवडून गेले आहेत. सन 2008 मध्ये आणि 2014मध्ये ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत. यानंतर लोकसभा निवडणुकीत सन 2019 मध्ये तिसऱ्यांदा त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात  होती . मात्र ऐनवेळी एक‘क्लीप’ सोशल मीडीयावर व्हायरल झाली अन् पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली होती.

 

आता  ते पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले असून  पक्षाच्या अनेक बैठकिला त्यांची उपस्थितीही लावत  आहेत.