जळगाव : जळगाव लोकसभेत भाजप उमेदवार स्मिता वाघ आणि शिवसेना (उबाठा गट) करण पाटील (पवार) यांच्यात थेट लढत झाली. जळगाव लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी साधारण ५८.४७ टक्के मतदान झाले. या निवडणूक निकालाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली असून, ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, जळगाव लोकसभेत स्मिता वाघ की करण पाटील (पवार) अशी चर्चा सुरु झाली आहे.
जळगावात कुणाचं पारडं जड होतं ?
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेले पाहायला मिळते. पण त्यापूर्वी देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघांप्रमाणं इथंही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचे हरि विनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते. त्यानंतर शिवराम राणे, एस.एस.सय्यद, कृष्णराव पाटील, यादव महाजन अशा काँग्रेसच्या अनेक खासदारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. पण नंतर गुणवंतराव सरोदे यांनी हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए. टी. पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळत याठिकाणचा भाजपचा बोलबाला कायम ठेवला. तर गेल्यावेळी उन्मेष पाटील याठिकाणी भाजपकडून निवडून आले होते.
२०१९ ची परिस्थिती
१ ) उन्मेष पाटील, भाजप – 713874
2) गुलाबराव देबकर, राष्ट्रवादी काँग्रेस – 302257
3) राहुल बनसोडे, बहुजन समाज पार्टी – 3428
4) ईश्वर मोरे, बहुजन मुक्ती पार्टी – 1262
5) अंजली बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी – 37366
6) संत श्री बाबा महाराज महाहंसाजी, हिंदुस्थान निर्माण दल – 1295
7) मोहन बिऱ्हाडे, राष्ट्रीय समाजवादी पार्टी – 670
8) शरद भामरे, राष्ट्रीय जनशक्ती पार्टी – 817
9) अनंत महाजन, अपक्ष – 6562
10) ओंकार जाधव, अपक्ष – 3144
11) मुकेश कुरील, अपक्ष – 1383
12) ललित शर्मा, अपक्ष – 1108
13) सुभाष खैरनार, अपक्ष – 1629
14) रुपेश संचेती, अपक्ष – 3150
राज्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान
अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के, नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के.