Jalgaon Municipal Corporation: महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज विविध भागात कारवाई करत सुमारे 151 किलो नायलॉन मांजा केला जप्त केली.
गोपाळपुरा येथील गोलू पुरण खीची यांच्याकडून नायलॉन मांजाचे 100 नग रील ,सुप्रीम कॉलनीतील कृष्णा नगरात बिज्रेश राजाराम तिवारी यांच्याकडून 26 नग रील , सुनीता दिनेश चौधरी यांच्याकडून नायलॉन मांजाचे 80 नग रील जप्त केले. चौथी कारवाई रायपूर कुसुंबा येथील सर्जेराव साहेबराव पाटील यांच्याकडे करत त्यांच्याकडून चार नग रील जप्त केलले.
ही कारवाई आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, उल्हास इंगळे, आणि आरोग्य निरीक्षक शुभम पोपटकर, मनोज राठोड, सुरेश भालेराव, कुणाल बारसे, चेतन हातागळे, मुकादम नंदू गायकवाड यांनी केली.