jalgaon Municipal Corporation: मनपा व वाहतूक पोलीसांतर्फे 21 दुचाकींवर कारवाई

jalgaon Municipal Corporation: महापालिका व शहर वाहतूक पोलीसांतर्फे City Traffic Police टॉवर चौक ते नेहरू चौक रस्त्यांवरील अतिक्रमणाविरूध्द कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार 12 रोजी देखील मनपा व शहर वाहतुक शाखेच्या पथकाने 21 वाहनांवर कारवाई केली.

 

महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण  encroachmentकाढून रस्ता मोकळा करण्याच्या सुचना बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12-12 मीटर अंतरावर सिमेंटचे ब्लॉक्स जमिनीत गाडून रस्त्यांची बॉर्डर लाईन निश्चित केली आहे. तसेच या बॉर्डर लाईनच्या मध्ये रस्त्यात वाहने लावणाऱ्यांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

रस्त्यात लागलेल्या दुचाकी ट्रॅक्टरमध्ये चढवून थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केल्या जात आहेत. त्यानंतर वाहतूक शाखेकडून संबधित वाहन धारकांना बेशिस्तपणे वाहन पार्क केल्याप्रकरणी दंडाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सध्या शहरातील टॉवर चौक ते नेहरू चौक भागातील अतिक्रण नियंत्रणात आले असून रस्ता रहदारीसाठी मोकळा झाला आहे.

एकीकडे स्वागत तर दुसरीकडे नाराजी

महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून जप्त झालेल्या वाहनधारकांना मात्र, आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मनपा व वाहतूक शाखेच्या पथकाने पहिल्या दिवशी (गुरूवारी) 34 वाहनांवर कारवाई केली असून दुसऱ्या दिवशी 21 वाहनधारकांवर कारवाई झाल्यामुळे वाहनधारकांना शिस्त लागलेली दिसून येत आहे.