जळगाव : सध्याचे युग हे डिजीटलचे युग आहे. बरेच आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन अर्थात इंटरनेट बँकिंग, जी पे, पेटीएम यासारख्या माध्यमातून होत आहेत. विमा, वीज बिल, फोन बिले, शॉपींग असेल यासारखे विविध देयके हे आता मोबाईलव्दारे पेड केले जात आहेत. त्यामुळे मालमत्ता करांच्या देयकांचा भरणाही मोबाईलव्दारे करण्याचा निर्णय महापालिकेच्या आयुक्त पल्लवी भागवत यांनी घेतला आहे. त्यामुळे आता महसूल विभाग डिजीटल करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी काय करावं लागेल ?
आयुक्त पल्लवी भागवत यांच्या संकल्पनेतून मालमत्ताधारकांना व्हॉटसअपवर मालमत्ताकराची बिले पाठविण्यात येणार आहेत. व्हॉटसअपवर आलेल्या बिलांवर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ‘पे नाऊ’ नावाचे बटन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या बटनवर क्लीक केले की, थेट संबधित मालमत्ताधारकांचे खाते उघडून त्यांचा कर किती आहे हे दिसेल. त्यानंतर तेथील ‘पे नाऊ’च्या बटनावर क्लिक करून मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्ताकराचा भरणा करता येणार आहे. असा अनोखा उपक्रम राबविणारी जळगाव महापालिका राज्यात पहिली ठरली आहे.
जळगाव महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या गुगल पे, फोन पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरून मालमत्ता कर भरता येत होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या महसूल विभागाने पुन्हा ही पध्दत सोपी करत क्यू आर स्कॅनरच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक मालमत्ताधारकांच्या बिलांवर क्यू आर कोड दिला जात होता. त्याद्वारे मालमत्ताधारकांना आपल्या मालमत्तांचा कर भरणे सोपं झालं होतं. यामध्ये आता पुन्हा नवीन सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेने नागरिकांना कर भरण्या साठी उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईट मध्ये नवीन फिचर अॅड केले आहे. या नवीन फिचरमुळे महापालिकेकडून नागरिकांना व्हॉटसअपवर आलेल्या पीडीएफ बिलांवर एक ‘पे नाऊ’ नावाचे बटन बिलाच्या खाली उजव्या कोपऱ्याला दिले जाणार आहे. या बटनावर क्लिक केलं की, संबंधित मालमत्ताधारकांचे नाव, मोबाईल नंबर, मालमत्ता क्रमांक, प्रभाग समिती, वार्ड नंब आणि कराची रक्कम दिसणार अ सदर रकमेच्या पुढे पुन्हा ‘पे नाज नावाचे बटन दिसेल. त्यावर क्वि करून मालमत्ताधारकांना आपल्य कराची रक्कम भरता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुि मालमत्ताधारकांच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे.
यांचे मोलाचे योगदान
महापालिकेची बिले आता मोबाईलवरून करता येणार आहे. यासाठी आयुक्त पल्लवी भागवत, महसूल विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड, सहआयुक्त गणेश चाटे व महसूल विभागाती अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.