Jalgaon Murder Case : धक्कादायक! ‘या’ कारणामुळे झाला पिंप्राळाच्या ‘त्या’ तरुणाचा खून

#image_title

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात आज रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. मुकेश रमेश शिरसाठ (३०) या तरुणाची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली. आता या खुनाच्या घटनेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत मुकेश रमेश शिरसाठ (३०) याचा भाऊ सोनू रमेश शिरसाठ (२२, रा. भीमनगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत मुकेश शिरसाठ याने ३ ते ४ वर्षांपूर्वी पूजा शिरसाठ यांच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे पूजा शिरसाठ यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, रविवारी, १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मुकेश शिरसाठ हा दुकानावर वस्तू आणण्यासाठी बाहेर गेला असता, पूजा शिरसाठ यांचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे आणि इतर आठ ते दहा जण घटनास्थळी आले.  त्यांनी मुकेशला सांगितले की, ‘तू पुजाशी पळून जाऊन लग्न केले, तुझ्या परिवाराला यापूर्वी आम्ही सोडून दिले, आता मात्र आम्ही तुझ्या परिवाराला संपवून टाकू’, असे सांगितले.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

तसेच सोबत आणलेले कोयते आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर गंभीर वार केले. मुकेश जोरजोरात ओरडू लागल्याने फिर्यादी सनी शिरसाठ, त्याचे आई-वडील तेथे आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सनी शिरसाठ यांच्या अंगठ्याला आणि पाठीमागून वार केले. सनी आणि इतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याचा रस्ता धरला, पण आरोपींनी त्यांना अडवले आणि त्यांनाही शस्त्राने मारहाण केली. यामध्ये निळकंठ शिरसाठ, ललिता शिरसाठ, करण शिरसाठ, कोमल शिरसाठ आणि इतर कुटुंबीय गंभीर जखमी झाले.

पोलिसांचा तपास आणि आरोपींची धरपकड

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, रामानंदनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गंभीर जखमी मुकेश शिरसाठ याला जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, काही संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली आहे.

पिंप्राळा हुडको परिसरात तणावपूर्ण वातावरण

खूनाच्या घटनेमुळे पिंप्राळा हुडको परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. घटनास्थळी शंभराहून अधिक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल झालेले आरोपी


सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले यासह इतर दोन अनोळखी आरोपींचा समावेश आहे.