Jalgaon News : ‘तू माझ्याशी का बोलत नाही’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव : अल्पवयीन मुलीचा ‘माझ्याशी का बोलत नाही’ असे म्हणत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पहूर पोलिसांत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता अल्पवयीन मुलगी ही एकटी घरी असताना गावातील आकाश संपत साबळे हा आला. तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझा फोटो व्हाट्सअ‍ॅप डीपीवर ठेवेल, तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणून तिचा विनयभंग केला.

घाबरलेल्या अवस्थेत पीडीतेने ही घटना घरात सांगितली. त्यानुसार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सोमवारी रात्री 10 वाजता संशयित आरोपी आकाश संपत साबळे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्ज करीत आहे.