जळगाव : माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्का बसत आहे. अशातच धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटात खिंडार पडले आहे. विशेषतः काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला आहे.
धरणगाव शहरातील काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे, शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश इंगळे, भगवान महाजन, चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे, सुभाष चौधरी, मुकेश चौधरी, शांताराम चौधरी, घनश्याम सातव, शब्बीर सय्यद, अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक भरत भाटिया, छोटू जाधव, मुकुंद नन्नवरे, सचिन दादा पवार, आबा महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.