जळगाव : बेकायदेशीर रित्या गांजाचा नशा करणाऱ्यांवर भुसावळ शहरात पोलिसांनी कारवाई केली आहे. यात रेल्वेस्थानक परिसरात तीन जणांवर तर शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याजवळ पाच जणांवर कारवाई करून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात आणि शिवदत्त नगरातील सरकारी दवाखान्याचा परिसरात काही तरुण हे बेकायदेशीररित्या गांजाच्या नशा करत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिवार, १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथकाने कारवाई केली.
यात संशयित आरोपी प्रकाश दीपक बाबर (वय- 20 रा. गांधीनगर खडका रोड भुसावळ), अजय सुनील वाघ (वय-20, रा. जुनी पोलीस लाईन भुसावळ), रवी अशोक तायडे (वय-19 रा. कंडारी तालुका भुसावळ), दानिश युनूस हॉटेल (वय-26 रा. लाल बिल्डिंग जवळ भुसावळ), शेख आवेश शेख फिरोज (वय-26, रा. मित्तल नगर भुसावळ), रिजवान बिग अलीम बेग (वय-२७, रा.जाम मोहल्ला भुसावळ), अब्दुल रहमान अब्दुल सलमान रंगरेज (वय 26, रा. जाम मोहल्ला भुसावळ) आणि उमर मोहम्मद रफिक (वय-28, रा.दत्तनगर खडका रोड भुसावळ) अशा आठ जणांना गांजाचा नशा करतांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर भुसावळ पोलीस ठाण्यात रविवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, जितेंद्र पाटील,, अन्वर दिलावर शेख, महेश चौधरी, पोलीस नाईक यासीन पिंजारी, तुषार इंगळे, रवींद्र भावसार, निलेश बाबुला, उमाकांत पाटील, भूषण जयंतकर यांनी केली आहे