जळगाव : ‘चांद्रयान-‘ अवकाशात भरारी घेण्याकामी केलेल्या कामगिरीत जळगाव जिल्हयातील हातेड (ता.चोपडा) येथील सुपुत्र संजय गुलाबचंद देसर्डी (जैन) यांचाही सहभाग आहे. यामुळे त्यांचे जिल्हावासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी चांद्रयान-३ अवकाशात सोडले इस्रोची ही तिसरी मोहीम आहे. चांद्रयान-३ अवकाशात झेपावल्यानंतर संपूर्ण भारतवासीयांकडून इस्रोतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले. यशस्वी कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये जिल्ह्यातील हातेड (ता.चोपडा) येथील सुपुत्र संजय गुलाबचंद देसर्डी (जैन) यांचाही समावेश आहे.
चंद्रयान-३ बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी संजय गुलाबचंद देशलहरा (जैन) यांचा सहभाग आहे. इस्रोमध्ये जवळपास वीस वर्षापासून मंगळयान चंद्रयान-2, चंद्रयान3 व इतर बरेच संशोधनवर काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ संजय जैन करीत आहेत. ते चोपडा वर्धमान जैन श्री संघाचे संघपती अध्यक्ष श्री गुलाबचंद इंदरचंद देशलहरा (जैन) यांचे चिरंजीव आहेत.
चांद्रयान-३ यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.